मुंबई – राज्य सरकारने १ डिसेंबरपासून शाळा सुरू केल्या आहेत. तेवढ्यातच आता ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराने दस्तक दिली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरूच राहणार की पुन्हा बंद होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. आजा ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील कार्मक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले की, शाळा सुरू करण्याचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली होती. तसेच, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, आता कोरोनाच्या नव्या अवताराची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे यासंदर्भात शिक्षणमंत्री हे पुन्हा एकदा सर्व बाबींचा आढावा घेणार आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांशीही त्या चर्चा करण्यात आहेत. त्यानंतर त्या योग्य निर्णय घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. बघा, हा व्हिडिओ
ओमायक्रॉन या नव्या विषाणूने कोण बाधित आहेत हे तपासण्यासाठी सात ते आठ दिवस जातात. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे का? हे तपासायला वेळ लागत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.@AjitPawarSpeaks pic.twitter.com/mjofhKoBJe
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 2, 2021