पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पवार म्हणाले की, पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी झाला आहे. तसेच, लसीकरणही लक्षणीरित्या वाढले आहे. खास म्हणजे, गेल्या १५ दिवसात लसीकरणामध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही बाब दिलासादायक आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात आजपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे सुरू झाली आहेत. ती १०० टक्के क्षमतेने सुरू व्हावीत, अशी नाट्यगृहचालकांची मागणी आहे. दिवाळीनंतर यासंदर्भातील निर्णय घेऊ. तेव्हा कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर १०० टक्के क्षमतेनुसार परवानगी दिली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.