गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुणे-नाशिक रेल्वेमार्गासह या विकास प्रकल्पांबाबत अजित पवारांनी दिले हे निर्देश… अधिकाऱ्यांची आता खैर नाही…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 10, 2023 | 12:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20230810 WA0070 1 e1691647723718

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हे सर्व विकास प्रकल्प विविध कारणांमुळे रखडत आहेत. या सर्वांचा आढावा पवार यांनी घेतला आहे. तसेच. यासंदर्भात दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांंगितले आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका १, २ आणि ३ ची उर्वरीत कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचं काम आता कुठल्याही कारणामुळे रखडणार नाही. पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील जीएसटी भवनासह राज्यातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात येतील.

दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे दूर केले जातील. ज्या विकासप्रकल्पांना केंद्र सरकारची मंजूरी, सहकार्य लागेल ते तात्काळ देण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. आवश्यकतेनुसार त्यांची भेट घेऊन राज्यातील प्रश्न मार्गी लावण्यात येतील. यापुढच्या काळात राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करणं हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला असून त्याची बैठक मंत्रालयात झाली. बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव दिपक कपूर, प्रधान सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, तसेच संबंधित जिल्ह्यांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला असून त्याची बैठक मंगळवारी (दि. ८) मंत्रालयात झाली.पुण्यासह राज्यातील विकास प्रकल्पांमधील अडथळे दूर करुन, कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी या बैठकीत आढावा घेण्यात आला. pic.twitter.com/ajSf5x3erW

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 10, 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रगतीत अडथळे ठरणारी कारणे दूर करण्याबाबत त्यांनी संबंधीतांना निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी बैठकीत सांगितले. पुणे मेट्रोची कामे तातडीने मार्गी लावा. पुणे रिंगरोडच्या कामात कुणी अडथळे आणत असेल तर त्याचा मुलाहिजा ठेवू नका. विकासकामात अडथळे ठरत असलेली अतिक्रमणे तात्काळ दूर करा. ज्या प्रकल्पांना केंद्राची परवानगी, मदत, सहकार्य अपेक्षित असेल त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री महोदयांना सादर करा. त्याची प्रत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतलेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने, पुणे मेट्रोच्या मार्गिका 1, 2 आणि 3, पुणे नाशिक रेल्वे, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, सातारा आणि अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, कोकणातील 93 पर्यटन केंद्रांना जोडणाऱ्या कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, पुणे रिंग रोड, मुंबईतील जीएसटी भवन, पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, पंढरपूर शहर आणि विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदीं विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. अशा प्रकारची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करुन विकासकामातील अडथळे दूर करण्यात येतील तसेच सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण केले जातील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

DYCM Ajit Pawar Development Projects Review Meet
Nashik Pune Railway Infrastructure Completion Mantralay Mumbai

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावातील नरबळीच्या घटनेनंतर पोलिस अधिक्षक आक्रमक… हाती घेतली ही मोहिम

Next Post

नक्की कुणामुळे मदत मिळाली? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? अखेर कलावतींनी स्पष्टच सांगून टाकलं… (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
Next Post
Kalawati

नक्की कुणामुळे मदत मिळाली? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? अखेर कलावतींनी स्पष्टच सांगून टाकलं... (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011