मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती स्वतः पवार यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. पवार यांनी त्यात म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1541367049477410824?s=20&t=w7dBPEH26WnzRtzUi3SWNQ
dycm ajit pawar covid positive