सिंधुदुर्ग – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह अन्य कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. अजित पवार यांचे सिंधुदुर्ग विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते विमानतळावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होते. यावेळी पवार यांच्या सोबत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्य मंत्री सतेज पाटील हे उपस्थित होते. हे सर्व जण एका कारने कार्यक्रमस्थळी जाणार होते. विशेष म्हणजे, पवार यांच्या कारचे सारथ्य एका महिलेने केले. त्यामुळे तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. सारथ्य करणाऱ्या या महिलेचे नाव आहे तृप्ती मुळीक. तृप्ती हा महिला पोलिस आहेत. या सारथ्याद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देत असल्याचे सांगण्यात येत आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/MahaDGIPR/status/1475038568749821952?s=20