नाशिक -वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस, महानगरपालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
मंत्री श्री. भुजबळ यांनी आज सकाळी द्वारका सर्कल परिसरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, मुंबई येथील हाजी अली परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यान्वित सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर या परिसरात यंत्रणा कार्यान्वित करावी. वाहतूक सरळ दिशेने राहील याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिग्नल परिसरासह रस्ते स्वच्छ राहतील याचीही काळजी घ्यावी. रस्त्यावर वाहने थांबविणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशाही सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.
०००००