बुलडाणा – जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. याच कामावर असलेल्या डंपरचा आज तढेगावजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १ कामगार जागीच ठार झाले असून कामगार अतिशय गंभीर जखमी झाले आहेत. तर, ७ कामगार जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपर रस्त्याच्या कडेला अचानक पलटी झाल्याने हा अपघात घडला. डंपरमध्ये लखंडाच्या सळया होत्या. तर, एकण १६ मजूर डंपरमधून प्रवास करीत होते. या भीषण अपघातात १३ मजूर जागीच ठार झाले तर १२ मजूर जखमी झाले आहेत. यातील ५ जमांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना किणगाव राजा, सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचापार्थ दाखल करण्यात आले आहे. तर, काही जखमींना जालना येथील जिल्हा रुग्णालयाल हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ठार झालेले कामगार हे लोखंडी सळईंच्या खाली दाबले गेले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने जखमींना बाहेर काढण्यात आणि उपचारार्थ दवाखान्यात येण्यामध्ये यश आले.