गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2025 | 7:07 am
in संमिश्र वार्ता
0
Duke of Edinburgh Visits British Era Bunker in Raj Bhavan 3 1024x680 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि. २) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी सुरुवातीला राजभवनातील पूर्वी जमिनीखाली तोपखाना असलेल्या हिरवळीची पाहणी केली. याच हिरवळीवर एडवर्ड यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ सन १९८० मध्ये चहापान झाले होते.

त्यानंतर एडवर्ड यांनी ‘जल लक्षण’ या राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेसाठी राखीव असलेल्या अतिथिगृहाला भेट दिली. या अतिथीगृहात सन १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ व त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचा राष्ट्रीय अतिथी या नात्याने मुक्काम होता. राज्यपालांचे सचिव प्रविण दराडे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी त्यानंतर एडवर्ड यांना ‘जल किरण’ अतिथीगृह, ‘जल विहार’ हे ऐतिहासिक सभागृह तसेच ब्रिटिश कालीन बंकर दाखवले.

यावेळी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खासगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल हे देखील उपस्थित होते. राजभवनातील अधिकाऱ्यांचे आभार मानून प्रिन्स एडवर्ड पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात राजभवन येथे असलेले ‘गव्हर्मेंट हाऊस’ स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे व राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राचे राजभवन झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात इतक्या कोटींची मोठी तरतूद

Next Post

पावसाची व थंडीची शक्यता किती… जाणून घ्या हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post
rain1

पावसाची व थंडीची शक्यता किती… जाणून घ्या हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011