शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दुगारवाडी धबधबा येथे अडकलेल्या २२ पर्यटकांची मध्यरात्री सुखरूप सुटका; एक बेपत्ता

by Gautam Sancheti
ऑगस्ट 8, 2022 | 11:08 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220808 WA0005 e1659936556949

 

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  दुगारवाडी धबधबा बघण्यासाठी गेलेल्या २२ पर्यटकांना रविवारी मध्यरात्री सुखरुप बाहेर काढण्यात आले. पाणी वाढल्यामुळे हे सर्व पर्यटक अडकून पडले होते. वेळीच मदत मिळाल्याने हे पर्यटक सुखरुप आहेत. अन्यथा मोठा दुर्दैवी प्रसंग घडला असता असे सांगण्यात येत आहे.

सध्या मुबलक पाऊस पडत असल्याने त्र्यंबकेश्वर परिसराचे निसर्ग सौदर्य खुलले आहे. अप्रतिम निसर्ग, डोंगरावरुन कोसळणारे धबधबे, खळखळुन वाहणारे नद्यानाले, ओहोळ बघण्यासाठी हजारो पर्यटक इकडे वळत आहे. परिसरातील प्रसिध्द दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक गर्दी करत असतात. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. तथापी रविवारी पावसाचा जोर वाढला असताना देखील धबधब्यावर पिकनिकसाठी जाण्याचा अट्टहास काही पर्यटकांच्या अंगलट आला.

काल रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं धबधबा पाहण्यासाठी काही पर्यंटकांनी गर्दी केली होती. धबधब्याचं सौंदर्य आणखी जवळून पाहता यावं यासाठी त्यांनी आणखी जवळ जाण्याचं धाडस केलं. आणि या पर्यटकांचं हेच धाडस अंगलट आलं. मुसळधार पाऊस, अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि अंधार यांमुळे पर्यटक अडकले होते. मोबाईलला रेंज नसल्यानं संपर्कही होत नव्हता. स्थानिक पर्यटक तेथुन वर आल्यावर त्यांचेमार्फत पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली आणि बचावकार्य सुरु झालं. रात्री ८ नंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. पाऊस, अंधार यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. पण अखेर प्रशासनाना पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. तरीही एका पर्यटकाचा मात्र अद्याप शोध सुरु आहे.

स्थानिक ग्रामस्थ, नाशिक क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन, वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन यांनी खडतर प्रयत्न केले. सदर बचाव कार्या करीता नाशिक उपवनसंरक्षक रेड्डी, नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, इगतपुरी – त्र्यंबक उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, तहसिलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, निवासी नायब तहसीलदार स्वप्निल सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी पवार, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, जाधव व तलाठी यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान अविनाश गरड, रा. आंबेजोगाई, जि-बीड हे वाहून गेलेले असल्याने त्यांचा शोध घेवूनही ते रात्री मिळून आलेले नाहीत, त्यासंदर्भात शोधकार्य आज सकाळी सुरू करण्यात आले आहे.

Dugarvadi Waterfall 22 Tourist Rescue Operation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवल्यात तीन एकर बाजरी पिकावर शेतक-याने फिरवला नांगर ( व्हिडीओ )

Next Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011