अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील करंजाडच्या नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना हाल सोसावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे. संबधीत अधिकारी व कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे अद्यापही या पुलाचे काम अपूर्ण आहे. सध्या मुसळधार पावसाने करंजाडी नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलाअभावी नदी पलीकडच्या वाड्या, वस्त्यांवरील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क तुटला असून, शाळेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून तसेच पुलाच्या अर्धवट कामावरूम कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. वाहनांना तर ४ ते ५ किलोमीटर फेरा मारून गावात यावे लागते. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी अडचण होत असून पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.