सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयात शेतक-यांनी नगदी पिक म्हणून टोमॅटोची लागवड केली. पण, अतिरीक्त होत असलेला पावसामुळे काढणील्या आलेल्या पावसामुळे टोमॅटोवर काळे डाग पडून टोमॅटो खराब होत आहे. तर झाडांवर रोगांचा प्रदुर्भाव होत असल्याने औषधांची फवारणी करुन ही त्याचा फायदा होत नसल्याने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झाला आहे.