मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव जवळील टोकडे गावातील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेला भगवान फरस हा दुग्ध व्यवसायिक बाईकवर करत असलेल्या स्टंटमुळे सर्वांना परिचित आहे. दररोज २० किलोमीटर बाईकवरून दूध वाहतूक करतांना थंडीत हात सोडून बाईक तो चालवतो. चित्रपटात स्टंटमॅन काम मिळेल या पॅशनमधून त्याने बाईकवरील स्टंट करायला सुरुवात केली. आज भगतसिंग १८ प्रकारचे स्टंट करतो. त्याचे अनेक स्टंटचे व्हिडिओ सुध्दा व्हायरल झाले आहे. तसे स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र मालेगाव परिसरात मात्र भगतसिंगच्या स्टंटची चर्चा आहे. माझ्यासारखे स्टंट इतरांनी करू नये असा संदेशही भगतसिंग देत असतो.