शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात… या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशात साजरी करण्यात येते.वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई आणि सत्यशोधक, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सलग ८ व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुबई येथील शिवजयंतीसाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ विचारवंत, उद्योजक व प्रेरणादायी वक्ते प्रवीण दादा गायकवाड हे उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना गायनाने झाली. विजय सिंह शिंदे यांनी शिवगर्जना दिली.
प्रमुख वक्ते प्रवीणदादा गायकवाड यांनी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा” या विषयीयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील तरुणांनी आता संपूर्ण जगामध्ये नोकरी व व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडायला पाहिजे. नुसतं आरक्षणावर अवलंबून न राहता, कौशल्यविकास साधुन जगात विविध क्षेत्रामध्ये आपला जम बसवला पाहिजे.उद्योग, व्यापार करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे तसेच बाहेरच्या देशात ‘कम्युनिटी लिविंग’ प्रमाणे सोबत असायला हवं. प्रमुख पाहुण्यांच्या व्याख्यानानंतर विक्रम भोसले यांनी दुबई च नुकतंच तयार झालेलं ‘फ्युचर म्युझियम’ विषयी सर्वांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विक्रम भोसले यांनी सत्यशोधक म्हणजे काय , त्यांची कार्य याविषयी माहिती दिली. आतापर्यंतचा ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच व सत्यशोधक दुबई’ यांचा प्रवास सर्वांसमोर सादर केला. तदनंतर रामेश्वर कोहकडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
या शिवजयंती निमित्त उत्कृष्ठ भाषणकला किंवा पोवाडा या लहान मुलांसाठीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. सर्व विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच दुबई येथे वाचन संस्कृती तयार व्हावी यासाठी “शिवग्रंथ पेटी आपल्या दारी” हा विशेष उपक्रम दुबई येथे राबवण्यात येतो, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख व मुकुंदराज पाटील यांनी तर आभार आशिष जीवने,अमोल कोचळे व विजयसिंह,जितुदादा सपकाळे यांनी आभार व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष जीवने,अमोल कोचळे, विक्रम भोसले,विजयसिंह शिंदे, संतोष सपकाळे,सुनंदा सपकाळे, साईनाथ मांजरे,मुकुंदराज पाटील, निखिल गणूचे,अभिजित देशमुख, जितू सपकाळे,रामेश्वर कोहकड़े व पंकज आवटे यांनी परिश्रम घेतले. या दुबई येथे सलग ८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी – संयुक्त अरब अमिराती मधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
व्हिडीओ स्पर्धेतील विजेते
१)रुद्रानील जयराज लाड
२)विराज भोसले
३)गार्गी सागर आहेर