जगात भारी – दुबईतील विठ्ठल वारी
– रुपेश मोवाडे
मराठी जणांना विठुरायाचं वेड आणि पालखी-दिंडी ची वारी हे जगातलं एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे ! कुणालाही कुतूहल वाटणारा हा चमत्कार आहे. यूएई मध्ये २०१५ साली सुरु केलेली वारी दोन वर्ष करोनामुळे चुकली त्यामुळे परदेशी वारकऱ्यांचे मन थाऱ्यावर नव्हते , पण युगानुयुगे कर कटावर ठेऊन यावर्षी प्रती पंढरपूर दुबईला प्रकट केलेच…
प्रत्येक यूएई मध्ये असणाऱ्या सजीवाच्या हृदयात आषाढी एकादशी ची ओढ लागली . काय ती पालखी – तिची सजावट , दिंडी-रिंगण , एक सुरात अभंग , मनोमन दर्शन , अख्खी वारी आणि आलेल्याला विठ्ठलमय अनुभव जपून ठेवला आहे . शारजाहतील गणेश भजन मंडळाची पुण्याई , त्यातील एकूणएक माणसांची मेहनत , विचार , एकमार्गी कल , त्यामुळे सुजल सफल संपूर्ण आयोजन झालं . यूएई मध्ये बकरीदचा सण पण यादिवशीच साजरा झाला.
“ईयर ऑफ टॉलरन्स” म्हणून मुस्लिम देशांमध्ये सर्व धर्माचा आदर हा मानाचा समाजाला जातो .सर्वधर्मीय देश असल्याचा अनुभव या पालखीद्वारे अख्ख्या जगाने घेतला . सगळ्यांनी याची डोळा , याची देही वारी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवली . खूप लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडल्यासारखे झाले आणि आनंद अद्वितीय झाला. भाळी टिळा बघून अख्ख दुबई विठ्ठलमय झालं होतं.
बाहेर एवढ्या ४५ डिग्री उष्णतामान असून सुध्दा सुमारे १२०० मंडळी जमलेली बघून लगतच असलेल्या ” दुबई कॅनाल पण चंद्रभागा नदी भास व्हायला लागला . जे एस एस प्रायवेट स्कूल ,अल सफा एरिया ,बिसिनेस बे च्या ऑडिटोरियम मध्ये हा भव्य सोहळा झाला . ताल मृदूंगाच्या भजनाने सुरुवात झाली आणि पालखी- रिंगण मध्ये सर्व भाविकांनी यथेच्छ फुगड्या आणि भक्ती नाच केला.
पाच तास चाललेल्या या भक्तिमय सोहळ्यासाठी प्रसादाची, उपवासाचे खाद्ये , फळे , मुलांसाठी खाद्ये अशी व्यवस्था करण्यात आली होतो . या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळ दुबई , दासबोध अभ्यास वर्ग , स्वामी समर्थ केंद्र दुबई , शिंपी समाज दुबई , बालसंस्कार मंडळ,ग्रंथ तुमच्या दारी मधील सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले.
श्री विठोबा अहिरे -रायगड , शेखर दिवाडकर -मुंबई ,संभाजी दळवी -कोल्हापूर , दीपक वेदरे- रत्नागिरी , बाबूभाई काष्टे, अजय नाडकर-महाड, नितीन माने -पुणे ,प्रीतम वाघ-मुंबई, प्रसाद सांगोडकर -गोवा ,दीपक पाटील-जळगाव ,अमोल खंबाट -औरंगाबाद ,शुभांगी साका-पुणे ,सदानंद भोईर – खेड ,मदन गुडेकर -चिपळूण ,गजानन वाघमारे- यवतमाळ , किशोर मुंढे – जुन्नर, रुपेश मोवाडे-नागपूर यांच्या सहभागामुळे महाराष्ट्र वाळवंटातही विठ्ठल नामात तल्लीन झालं .
अवतरली दुबई राऊळी ,विठ्ठल वारी
उत्सव भक्तीचा ,करू जय हरी ..जय हरी… ||धृ
केला विठ्ठल पंढरी ,सुख वाटले जीवा
नाही उसंत परदेशी , मग वाळवंटीच चित्ती दिवा … || १
चंदनाची उटी भाळी, गर्जती लेकरं सुखाने
झिम्मा फुगड्या उदंड , दिंडी पालखीत आवडीने … || २
विठ्ठल ठायी ठायी , सुख आनंदाचा पूर
कराया अवघा गजर | सूरात एक अमुचा सूर… || ३
कैवारी तो ,पाठीराखा तो ,कृपा त्याची माथी
टाळ – मृदंग – वीणा – मुखी नाम , स्वानंद किती !!!… || ४
भक्तीच्या वाटेवरी, २८युगे उभा दर्शनी ,
साक्षात: मन तृप्तीत भिजुनी ,तुझ्या पूजा अर्चनी… || ५
निर्गुण निराकार पाहण्यास , व्हावा प्रवास
दंगलो भान हरपून ,आता पांडुरंगाचा हव्यास .. ||६
वैष्णवांचा मेळा ,रंगणार सोहळा भारी
धुंदीत बोला , विठ्ठल विठ्ठल जय हरी… || ७
आणा टाळ – करू रम्य नाद , असू द्या पांढरा पेहराव,
केवळ भाव भक्तीचा ,घसरावा वेगाने अहंभाव … || ८
दुबई कॅनाल तीरी , दिसला तो कर कटावरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी, अनुभवली एकदा तरी .. || ९
Dubai Ashadhi Ekadashi Vitthal Vari Marathi Peoples Video