नाशिक – दारु पिऊन वाहन चालविणा-यांवर वचक निर्माण होण्यासाठी व त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह बाबत २४ ऑक्टोंबर रोजी विशेष मोहिम घेतली होती. त्यात रात्री आठ वाजेपासून रात्री १२ पर्यंत अवघ्या अवघ्या ४ तासात मद्यधुंद वाहन चालकांवर प्रभावी कायदेशीर करत २०८ गुन्हे दाखल केले आहे. यात अहमदनर जिल्हयात ४७, जळगाव ७०, नाशिक ग्रामीण १४, धुळे ३५, नंदुरबार ४२ असे गुन्हे दाखल झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली ही माहिती