मुंबई – मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणावर लक्ष ठेवणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करणारे वानखेडे यांनी अलीकडेच दोन पोलिस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचा संशय केला जात होता. वानखेडे यांच्या ताफ्यातील अधिकृत वाहनही बदलण्यात आले आहे.
वानखेडे यांच्या सुरक्षेच्या नवीन प्रोटोकॉलनुसार एनसीबी आणि मुंबई पोलिसांच्या सशस्त्र रक्षकांना त्यांच्या सुरक्षा ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे अधिकृत वाहनही बदलण्यात आले आहे. कारण समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांचे दोन कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवत असल्याची तक्रार दाखल केली होती.
वानखेडे म्हणाले होते की, त्यांच्या आईच्या अंत्य संस्कारांसाठी ते स्मशानभूमीत गेले होते, तेव्हा दोन कथित पोलीस तेथेही त्यांच्यावर नजर ठेवून होते. दोन्ही पोलीस ओशिवरा पोलीस ठाण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर त्या दोन्ही पोलिसांनी गुपचुप सीसीटीव्ही फुटेज घेतले असून वानखेडे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्नही केला.
समीर वानखेडे सध्या हाय प्रोफाइल मुंबई क्रूझ प्रकरणाची देखरेख करत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे. समीर वानखेडे हे एनसीबीचे सुप्रसिद्ध अधिकारी राहिले आहेत. यापूर्वीही सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासाचाही वानखेडे सहभागी होते. याशिवाय अनेक वेळा अन्य हायप्रोफाईल केसेसच्या तपासातही ते सहभागी झालेले आहेत.
दरम्यान, समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवण्याबरोबरच त्यांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलीस आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास अहवाल एका आठवड्यात येईल. आर्यन खानच्या जामिनावर काल गुरुवारीसुद्धा सुनावणी झाली, परंतु कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या प्रकरणात न्यायालय पुढील निकाल आता दि.२० ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे. या परिस्थितीत आता आर्यनला आणखी ६ दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत.