इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही शासकीय अधिकारी असो त्याने प्रामाणिकपणे जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा असते परंतु काही भ्रष्टाचारी अधिकारी वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतात आणि अवैधपणे संपत्ती गोळा करतात. असाच एक प्रकार बिहार मध्ये नुकताच उघडकीस आला.
ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार याच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली. या कारवाईत विभागाच्या पथकाचेही डोळे विस्फारले आहेत. कुमारच्या घरात नोटांनी भरलेले पाच पोते, कादगपत्र, सोनो-चांदीचे दागिने, चार कार आणि काही बँकांचे एटीएम कार्ड जप्त केले आहे. याची दखल घेत दक्षता विभागाने जितेंद्र कुमार विरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर दक्षता विभागाने ही कारवाई केली आहे.
जितेंद्र कुमार याच्या सुल्तानगंज, पटणा, जहानाबाद आणि गया येथील मालमत्तांवर पथकाने धाड टाकली. पथकाने करोडोंची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष म्हणजे पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी काही मशीन्स मागविण्यात आले. या नोटा तब्बल ४ कोटी रुपयांच्या असू शकतील, असा अंदाज आहे. तसेच छाप्यात चांदी व सोन्याचे दागिनेही आढळले आहेत.
या छाप्यात मालमत्तेची अनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. जलालपूर, जहानाबाद आणि पाटण्यात त्याचा प्रत्येकी एक फ्लॅट आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये त्याचा आणखी एक फ्लॅट आहे. याबाबत पथक कसोशीने तपास करीत आहे. त्यामुळेच कुमारची आणखीही मालमत्ता निदर्शनास येण्याची शक्यता आहे.
कुमार हा अधिकारी पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करीत होता, असा आरोप आहे. राज्य सरकारकडे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर एक पथक तयार करून त्याच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जितेंद्र कुमार सध्या फरार आहे.
https://twitter.com/hajipurrajesh/status/1540673428222386181?s=20&t=uy6c_GQlUzQ5H4o8zE4mQQ
Bihar drug inspector property raid 5 places seized currency notes crime corruption