नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्मनंट (कायमस्वरूपी) ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स आता अर्जधारकाच्या आधार कार्डमधील पत्त्यासह त्याच जिल्ह्यात बनविले जाईल. परवान्यासाठी अर्जदाराला ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल आणि आधार कार्ड लिंक करावे लागेल. हा नवा नियम ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांसाठी आहे. ज्या जिल्ह्यात लर्निंग लायसन्स बनवले जाईल, तेथे कायमस्वरूपीही करावे लागणार आहे.
भारतात सध्या कुठेही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येतो. तसेच, आता लर्निंग लायसन्स आपण कोठूनही घेऊ शकतो, परंतु कायमस्वरूपी लायसन्ससाठी आता बदल झाला आहे. त्यानुसार, अर्जदाराला त्याच्या आधारकार्डचा जो पत्ता आहे त्याच जिल्ह्यात आता पर्मनंट लायसन्ससाठी जावे लागेल. तथापि, हा नियम १ जूनपूर्वी केलेल्या लर्निंग लायसन्ससाठी लागू होणार नाही. नवीन प्रणालीमध्ये लर्निंग लायसन्स कुठूनही देता येणार असले तरी कायमस्वरूपी लायसन्ससाठी आधारचा पत्ता असलेल्या जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयात जावे लागेल.
ही व्यवस्था १ जूनपासून लागू करण्यात आली आहे. १ जून रोजी लर्निंग लायसन्स घेतलेल्या लोकांना त्यांच्या आधार पत्त्याच्या जिल्ह्यात एक महिन्यानंतर कायमस्वरूपी अर्ज करावा लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही नोकरी जर मुंबईत करीत असाल आणि तुमच्या आधार कार्डवरील पत्ता जर कोल्हापूरचा असेल तर पर्मनंट ड्रायव्हिंग लायन्ससाठी तुम्हाला कोल्हापूरला जावे लागेल.
Driving License rule change permanent license this is compulsory now