इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येत्या १८ नोव्हेंबरला चित्रपट गृहामध्ये पुन्हा एकदा थरार रंगणार आहे. ७ वर्षांनी दृश्यम या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होत आहे. ‘दृश्यम २’ मध्ये देखील अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना या जबरदस्त स्टारकास्टमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. तर बॉलीवूडमध्ये गेले काही दिवस आलेली मरगळ या चित्रपटामुळे झटकली जाईल अशी आशा ‘दृश्यम २’ ने पल्लवित केली आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन दिवस शिल्ल्क असताना प्रेक्षकांनी हजारो तिकिटांचे ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवले आहे. विजय साळगांवकर यावेळी आपल्या कुटुंबाला कसे संरक्षित करेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. २ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो त्यामुळे तो आपल्या लक्षात असतोच. मात्र ‘दृश्यम’ या चित्रपटात हाच दिवस आला होता. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी विजय आपल्या कुटुंबाकडून २ ऑक्टोबरला गांधी जयंती होती आणि आपण कुठे कुठे गेलो हे घोकून घेतो. त्यामुळे तो डायलॉग प्रचंड व्हायरल झाला.
आताही ‘दृश्यम’ हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार असल्याची चिन्हे आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार ‘दृश्यम २’ने आतापर्यंत ४३ हजार ६३३ तिकिटे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विकली आहेत. त्यांनी सांगितले की, चित्रपटाची PVR मध्ये २० हजार २७ तिकिटे, INOX मध्ये १५ हजार ६६७ आणि Cinepolis मध्ये ७ हजार ९३९ तिकिटे विकली गेली आहेत. दुसरीकडे अजूनही चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे ऍडव्हान्स बुकिंगचा हा आकडा वाढू शकतो. विजय साळगांवकर याची फाईल पुन्हा उघडली जाणार आहे. आधीच्या भागात चौथी नापास विजय साळगांवकरने संघर्ष करून आपल्या कुटुंबाचे रक्षण केले होते. दुसरीकडे आपल्या मुलाचा कसून शोध घेणारी आई म्हणजेच तब्बू मुलासाठी व्याकुळ झाली होती.
आता या भागात तब्बू आपल्या मुलाचा बदला घेणार का ? विजय यावेळी आपल्या कुटुंबाला कसं वाचवणार? अक्षय खन्ना यावेळी चित्रपटात असल्याने त्याच्या अभिनयाची जादू चालणार का ? तब्बल ७ वर्षांनी आता कोणती रहस्ये उघडणार साळगांवकर कुटुंबात कोणती वादळे येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ३ दिवसांनी मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे.
दरम्यान, बॉलीवूडमध्ये एकामागून एक येणारे चित्रपट आपटत आहेत. बिग बजेट चित्रपट येऊनही प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे आमिर खान सारख्या निर्मात्याला देखील याचा मोठा फटका बसला. एकही मोठा कलाकार यातून सुटलेला नाही. बॉयकॉट, दर्जेदार कथांचा अभाव असे नैराश्यजनक वातावरणात आता ‘दृश्यम २’ दूर करेल आणि चित्रपटगृह प्रेक्षकांच्या गर्दीने फुलवेल असे चित्र आहे.
Drishyam Movie Ticket Booking Before Release