इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपले, स्वतःचे घर घेणे, घर असणे हे फिलींग खूपच वेगळे असते. आपली आयुष्यभराची पुंजी लावून अनेकदा हे घर खरेदी केले जाते. म्हणूनच स्वतःचे घर हे प्रत्येकासाठीच फार खास असते. घर म्हटलं की ते फक्त रहायचं ठिकाण नसतं तर आपण सजवलेल्या या घरात आपल्या अनेक आठवणी, भावना असतात. नवीन घरात त्या नव्याने निर्माण होणार असतात. त्यामुळे घराचा विषय आला की कुणीही साहजिक भावूक होतोच. घर हे घर असते, ते सेलिब्रिटींचे असो किंवा सामान्य माणसाचे. त्यामागच्या भावना सारख्याच असतात.
बॉलीवूडचे जोडपे इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांनी मुंबईतील जुहू येथे ३ बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचा फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. इशिता आणि वत्सल यांनी त्यांच्या घरासमोरील चित्रात एकत्र पोज दिल्या आहेत. नवीन घेतलेल्या या घरामुळे हे दोघे कुशल टंडनचे शेजारी देखील बनले आहेत.
सध्या या घराचे बांधकाम सुरू आहे. याला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. ‘नवीन वर्षाचा नवीन संकल्प# ड्रीमहाऊस’. अभिनेत्री इशिता दत्ता ही नुकतीच ‘दृश्यम २’ या चित्रपटात झळकली होती. यात तिने अभिनेता अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिता म्हणाली की, नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात आणते. नवीन घर म्हणजे आठवणी निर्माण करण्याची आणि स्वप्ने साकारण्याची संधी. हे एक स्वप्न आहे, जे मी आणि वत्सलने एकत्र पाहिले होते आणि आता ते प्रत्यक्षात घडते आहे. ही भावना आम्हाला अपार प्रेम आणि आनंद देते. आमचे सर्व कुटुंब आणि मित्र ज्यांनी आम्हाला काहीही केले तरी पाठिंबा दिला आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात कृतज्ञता आहे, असे इशिताचे म्हणणे आहे.
इशिता ‘एक घर बनाऊंगा’, ‘बेपनाह प्यार’ आणि ‘थोडा सा बादल थोडा सा पानी’ यांसारख्या टीव्ही शोसाठी देखील ओळखली जाते, तर वत्सल ‘टारझान: द वंडर कार’, ‘एक हसीना थी’ मध्ये दिसला होता. ‘हासील’, या चित्रपटात झळकला होता. कुशलने इशित आणि वत्सलला नवीन घरासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि म्हटले आहे वेलकम शेजारी. इशिता आणि वत्सलचे हे ड्रीम होम जुहू सर्कलच्या जवळ असून वत्सलला खूप वर्षे मुंबईत घर घेण्याची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे.
Drishyam Fame Actress Ishita Dutta New Home
Mumbai Vatsal Sheth Bollywood New Year