गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटीची ४८ किलो सोन्याची पेस्ट केली जप्त

by India Darpan
जुलै 10, 2023 | 11:46 am
in संमिश्र वार्ता
0
image001ET00

सुरत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑपरेशन गोल्डमाइन अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48.20 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली आहे. अलीकडच्या काळात विमानतळावरील ही सोन्याची सर्वात मोठी कारवाई आहे.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी 07.07.2023 रोजी शारजाहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX172 ने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात तस्करी करण्यासाठी पेस्ट स्वरूपात सोने घेऊन आल्याच्या संशयावरून 3 प्रवाशांना रोखले. यावेळी या प्रवाशांच्या हातातील बॅगेज तसेच चेक-इन बॅगेजची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 5 काळ्या पट्ट्यांमध्ये लपवलेल्या 20 पांढऱ्या रंगाच्या पॅकेटमध्ये पेस्ट स्वरूपात लपविलेले 43.5 किलो सोने सापडले.

हे सोने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने भारतात तस्करी करण्यासाठी लपवण्यात आल्याचे प्रवाशांच्या चौकशीत उघड झाले. याशिवाय आणखी 4.67 किलो सोन्याची पेस्टही पुरुष स्वच्छतागृहातून जप्त करण्यात आली. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण 48.20 किलो सोन्याच्या पेस्ट मधून सुमारे 25.26 कोटी रुपये किमतीचे 42 किलोपेक्षा जास्त सोने (शुद्धता 99%) प्राप्त झाले आहे.

सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले त्या आधारे एका अधिकाऱ्यासह 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक संघटित तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. हे संपूर्ण जाळे मोडून काढण्याच्या उद्देशाने अशा प्रकरणांमध्ये विमानतळावरील अधिकाऱ्यांसह अन्य व्यक्तींचा सहभाग शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे तस्करी करणारी टोळी उघडकीला आली आहे. ही कारवाई म्हणजे देशात मौल्यवान वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाद्वारे सातत्याने सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! इगतपुरीच्या मुलीची जळगावात विक्री… लग्नही लावले… महिलेसह दोघांना अटक

Next Post

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जिल्ह्यांमधील शाळेचा एकत्रित अहवाल केला जारी

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जिल्ह्यांमधील शाळेचा एकत्रित अहवाल केला जारी

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011