पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आता एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आले आहे. पाकिस्तानी हेरांना भारताची गुप्त माहिती पुरुविल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली आहे. एटीएस केलेल्या चौकशीत कुरुलकरने काम झाल्यावर अनेक नंबर्स ब्लॉक केल्याचे उघड झाले आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकरचा मोबाईल, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यातून अनेक नंबर बोलणे झाल्यावर ब्लॉक करण्यात आल्याचे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे नंबर्स ब्लॉक केल्यानंतर संबंधित व्यक्तीने नंबर का ब्लॉक केला, असा मेसेज केल्याचेही दिसत आहे, असे एटीएसचे म्हणणे आहे.
कुरुलकर याने पाकिस्तानी हेरांना फोनवरून माहिती पुरविल्यानंतर हे नंबर्स ब्लॉक केले असावेत, असा एटीएसचा अंदाज आहे. कुरुलकरकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा फॉरेन्सिक अहवाल मंगळवारी दुपारी मिळाला असून त्या अहवालाच्या अनुशंगाने सखोल तपास करण्यात येणार आहे, असे एटीएसने स्पष्ट केले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी कुरुलकर याला अधिक तपासासाठी १५ मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
सरकारी गेस्ट हाऊसवर महिला
डॉ. प्रदीप कुरुलकर याला हनी ट्रॅपमध्ये अडकविताना पाकिस्तानी हेरांनी ज्या महिलांचा वापर केला त्या महिला डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवर येऊन गेल्या आहेत, अशी माहिती हाती लागली आहे. कुरुलकर हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवरच या महिलांना भेटायचा, असे कळले आहे.
शासकीय पासपोर्टवर दौरे
कुरुलकर याच्याकडे दोन पासपोर्ट असून शासकीय पासपोर्टवर आतापर्यंत त्याने ५ ते ६ देशांचे दौरे केले आहेत. तो कोणत्या देशात कुणाला भेटायला गेला याचा तपास लावला जात आहे. शिवाय कुरुलकर याच्या खात्यात बाहेरच्या देशातून काही पैसे आले का, याचीही माहिती एटीएसद्वारे घेतली जात आहे.
DRDO ऐसा विभाग है, जो सीधे PM के नीचे आता है।
संघ से जुड़ा शख्स देश की संवेदनशील सूचनाएं दुश्मन देश को दे रहा है, लेकिन खबर गायब है।
अगर ये शख्स किसी अन्य पार्टी से जुड़ा होता तो क्या होता?
वहीं, जब प्रदीप कुरुलकर पकड़ा गया तो संघ ने कहा- इससे हमारा कोई नाता नहीं है। यही संघ… pic.twitter.com/pAufBdwm9z
— Congress (@INCIndia) May 10, 2023
DRDO Scientist Pradip Kurulkar ATS Investigation Honey Trap