विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ)ने हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबसमवेत सहनिर्मित केलेल्या २ डी ऑक्सी-डी-ग्लूकोज (२ डीजी) या नव्या औषधाची किंमत निश्चित झाली आहे. कोरोनावरील उपचारासाठीचीही पावडर अतिशय प्रभावी आहे. त्याचे दर अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले आहेत.
पॅकेटमध्ये येणाऱ्या या औषधाची किंमत नागरिकांसाठी ९९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने हे औषध कमी किंमतीत उपलब्ध होईल. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) अलीकडेच कोरोनाविरूद्ध या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
डीआरडीओचा दावा आहे की, या औषधाच्या वापरानंतर, रुग्णांच्या ऑक्सिजनवरील अवलंबन कमी होईल. कारण दुसर्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांना सर्वाधिक ऑक्सिजनची आवश्यकता होती. डीसीजीआयच्या मान्यतेनंतर औषधोपचारांच्या क्लिनिकल चाचणी निकालांमध्ये असे दिसून येते की, हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना त्वरित बरे करते.
ऑक्सिजनवरील त्यांचे अवलंबन कमी करते. २-डीजी औषधाचा वापर केल्यानंतर कोरोनाचे रुग्ण इतरांपेक्षा कमी दिवसात बरे झाले. कोविड -१९ पासून संक्रमित लोकांना या औषधाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ऑक्सिजनवर जास्त अवलंबून असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वरदान आहे.