दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखेर द्रौपदी मुर्मू या देशाच्या पुढील राष्ट्रपती झाल्या आहेत. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत. ज्यामध्ये त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या तुलनेत त्यांना जवळपास दोन तृतीयांश मते मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री द्रौपदी मुर्मूच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करीत आहेत.
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. ६४ व्या वर्षी त्या राष्ट्रपती झाल्या आहेत. बहुदा आजवरच्या इतिहासात सर्वात कमी वयात राष्ट्रपती भवनात पोहोचलेल्या व्यक्ती त्या आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती अशीही त्यांची ओळख झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा स्वातंंत्र्यानंतर जन्मलेले आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1550131416226476033?s=20&t=_dU-VrpndPx2g9Fy_8VjMQ
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना ७४८ पैकी ५४० मते मिळाली. याशिवाय यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली. पहिल्या फेरीत एकूण ७४८ मते वैध ठरली, ज्याची किंमत ५ लाख २३ हजार ६०० इतकी आहे. त्यापैकी ५४० मते द्रौपदी मुर्मू यांना गेली, ज्यांचे मूल्य ३ लाख ७८ हजार एवढे आहे. दुसरीकडे, यशवंत सिन्हा पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने मागे पडले होते. त्यांना फक्त २०८ मते मिळाली, ज्यांचे मूल्य अंदाजे १ लाख ४५ हजार एवढे होते.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत पहिल्या फेरीतील द्रौपदी मुर्मूंची आघाडी आणखी वाढली. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीपर्यंत एकूण १८८६ वैध मतांची मोजणी झाली. त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना १३४९ मते मिळाली. याशिवाय यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांची संख्या ५३७ होती. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत, द्रौपदी मुर्मूंच्या मतांचे मूल्य ४ लाख ८३ हजार २९९ एवढे होते, तर यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य १ लाख ८९ हजार ८७६ होते. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यापासूनच द्रौपदी मुर्मू यांनी मोठी आघाडी कायम ठेवली. खासदारांच्या मतदानाच्या पहिल्या फेरीत विरोधी पक्षनेत्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपने असा युक्तिवाद केला की त्यांना पहिल्या फेरीत ५२३ मते अपेक्षित होती पण त्यांना ५४० मते मिळाली.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1550130948032696327?s=20&t=_dU-VrpndPx2g9Fy_8VjMQ
भाजपचे विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या घोषणेनंतर द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतरही अनेक विरोधी पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. बीजेडी, वायएसआर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, अकाली दल, शिवसेना, तेलुगु देसम पार्टी अशा अनेक पक्षांनी एनडीएचा भाग नसलेल्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला.
देशातील पहिल्या महिला आदिवासी उमेदवाराच्या नावावर द्रौपदी मुर्मू यांना हा पाठिंबा मिळाला आहे. खुद्द यशवंत सिन्हा यांचे नाव सुचविणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीही निवडणुकीच्या काही काळ आधी सांगितले होते की, भाजपने त्यांचे नाव आम्हाला आधीच सांगितले असते तर आम्ही आवश्यक विचार केला असता.
Draupadi murmu is now New President of India