नवी दिल्ली – भाजपने राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपर्दी मुर्मू यांची उमेदवारी घोषीत केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ही माहिती दिली. राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदा आदिवासी महिलेचे नाव पुढे आले आहे. मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषविले आहे. त्याचप्रमाणे त्या ओडिसा सरकारमध्ये मंत्री राहिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाला दुपारीच मंजुरी देऊन त्यांचे नाव घोषित केले आहे. त्यानंतर एनडीएकडून द्रौपर्दी मुर्मू यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
President Election Draupadi Murmu NDA candidate BJP announcement Trible