नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. उल्हास कुटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी डॉ. कुटे याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नगर परिसरामध्ये असलेल्या स्वामी हॉस्पिटलचा संचालक डॉ. उल्हास कुटे याने त्याच्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात डॉ. कुटे याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पोस्को व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित डॉ. उल्हास कुटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास अंबड पोलीस करित आहेत.
Dr Ulhas Kute Rape Case Booked
Nashik Crime Ambad Police Station