मुंबई – रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात बंद करुन उत्पादन वाढविल्यानंतरही राज्यात तुटवडा राहणार आहे. तशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने रेमडेसिविरच्या वितरणाचे नियंत्रण घेतल्याने हा तुटवडा राहणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.
बघा, ते काय म्हणताय
केंद्राने कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचं याच नियंत्रण स्वत:कडे घेतलं आहे. यातून महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल यामध्ये २६ हजार रेमडेसिवीर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 यांनी दिली. या निर्णयाने राज्यात १० हजार रेमडेसिवीरचा तुटवडा भासणार आहे. pic.twitter.com/PX6rnAvzLv
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 22, 2021
रेमडेसिवीर आयात करू शकत नाही. तो केंद्राचा अधिकार आहे. निर्यातदारांचा साठा वापरू शकत नाही. त्यावर केंद्राचे नियंत्रण आहे. केंद्राने पीएओ स्तरावर रेमडेसिवीर निर्माण करणाऱ्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा व देशाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ना. @rajeshtope11 यांनी केंद्राला केली
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 22, 2021