नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक जाहीर सभेत कोट्यवधी रुपयांच्या खोक्यांविषयी बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, मालेगाव मध्ये ठाकरेंची सभा झाल्यानंतर आमचे आमदार सुहास कादे यांनी रास्त मागणी केली आहे. प्रत्येक सभा झाल्यानंतर एकच शब्द निघतात. खोक. त्यामुळे नार्को टेस्ट केली की खोके कोणाकडून आले , आणि कुणाकडे गेले हे समजेल, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
डॉ. शिंदे यांच्या हस्ते आज नाशिक मध्ये मध्यवर्ती भागात शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले की, या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार बद्दल जनतेला मोठा विश्वास आहे. या सर्वांच्या विश्वासावर हे कार्यालय पात्र ठरणार आहे. समस्यांचे निवारण आणि वेगवेगळे सेल या कार्यालयात असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावरकर यात्रेवर टीका केली आहे. त्यावर डॉ. शिंदे म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात यावर मला काही बोलायचं नाही. सकाळी उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत लोकांचा दिवस खराब करतात. संजय राऊत यांच्या बोलण्यावरून आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. लोकांना देखील त्यांच्या बोलण्याचा वीट आलेला आहे, अशी टीका डॉ. शिंदे यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर मध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. याविषयी डॉ. शिंदे म्हणाले की, या अगोदरही जा सभा झाल्या त्यात तिन्ही पक्ष एकत्रच होते. फक्त आज अधिकृतपणे एकत्र आले आहेत. आतापर्यंतच्या सभा झाल्या. त्यात कोणाची माणसं होती ते आम्हाला सगळं माहिती आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले
Dr Shrikant Shinde on Uddhav Thackeray Narco Test Politics