इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक येथे आतंरराष्ट्रीय विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांच्या समवेत सुशासन संवाद रविवारी आयोजित करण्यात आला होता. जगातील ५६ पेक्षा जास्त देशांत आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन Conflict Management आणि विकास धोरणाचा सल्ला देणारे डॉ.वासलेकर यांनी भारत सरकारच्याच्या सुद्धा विविध विभागांना सल्ला दिला आहे. या वेळी नाशिक मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले.
नाशिक सारख्या शहराच्या समस्या,अपेक्षा, विकासाच्या संधी व नागरीकांची जबाबदारी इत्यादी विषयांवर डॉ. संदीप वासलेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन भाजप गुड गव्हर्नन्स सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केले. गुड गव्हर्नन्स हे फक्त प्रशासकीय विषय नसून नागरीक सहभाग आवश्यक आहे तसेच औद्योगिक विकास, पर्यावरण, ट्रॅफिक मॅनेजमेंट, शहर स्वच्छता, आरोग्य, शहराचा योग्य विस्तार, आणि शासनाच्या विविध विभागांतील सुशासन या विषयावर चर्चा झाली.
या चर्चे प्रसंगी सुप्रसिद्ध डॉ.भरत केळकर, माजी पोलीस महासंचालक प्रताप दिघावकर, कार्पोरेट प्रशिक्षण सल्लागार व रा.स्व.संघ कार्यवाह सुहास वैद्य, अभिजीत कुलकर्णी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ कार्याध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक मारुती कुलकर्णी,जेष्ठ उद्योजक देवेंद्र बापट, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, जेष्ठ उद्योजक जितेंद्र ठक्कर, क्रेडाई अध्यक्ष कृणाल पाटील, सचीव गौरव ठक्कर, लघुउद्योग भारती माजी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय उद्योजक विवेक कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ महेश दाबक, मिलिंद जहागीरदार, मिलिंद कुलकर्णी, अतुल बेदरकर, राजेश मालपुरे, वास्तुविशारद सचिन गुळवे आदी उपस्थित होते. नाशिक शहराच्या दृष्टीने विविध विकास योजनेअंतर्गत आगामी काळात सकारात्मक बदल होण्यासाठी अन्य संघटना, विविध क्षेत्रातील तज्ञ , तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून शासन व प्रशासन यांच्या मार्फत प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.