नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमळनेर येथे होऊ घातलेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. याचनिमित्ताने डॉ. शोभणे यांच्याविषयी आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर…
डॉ. रवींद्र शोभणे
जन्म :१५ मे, १९५९ (खरसोली, जि.नागपूर)
शिक्षण: एम.ए.(मराठी),बी.एड्.,पीएच्.डी.
प्राचार्य, सरस्वती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोराडी रोड, नागपूर (निवृत्त)
शैक्षणिक अनुभव :
१. १९८४ ते १९८९ धनवटे नॅशनल कॉलेज येथे कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन
२. १९८९ ते २०१९ पर्यंत धनवटे नॅशनल कॉलेज येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्ययन
३. १९९१-९२,१९९२-९३ या काळात राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर विभागात अध्यापन
बृहत् संशोधन प्रकल्प :
‘महाभारताधीष्ठीत मराठी कादंबऱ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास (२००८ – २०११) विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा पुरस्कृत
संशोधनाचा अनुभव : (आचार्य पदवीचे मार्गदर्शक)
१. डॉ. मंजूषा सावरकर : सुभाष भेंडे यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास (२००७)
२. डॉ. अनिल बोपचे : राजन गवस यांचे कादंबरीविश्व : चिकित्सक अभ्यास (२००९)
३. डॉ. अशोक भक्ते : नागनाथ कोत्तापल्ले यांच्या ललितसाहित्याचा चिकित्सक अभ्यास (२०१२)
४. डॉ. अजय चिकाटे : पाच दलित कवयित्रींच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास (२०१३)
५. डॉ. विजय राऊत : डॉ. आशा सावदेकर यांचे साहित्यविश्व:चिकित्सक अभ्यास (२०१४)
६. डॉ. साधना सुरकार : आशा बगे यांच्या ललित साहित्याचा चिकित्सक अभ्यास (२०१६)
७. प्रा. अनिल दडमल: राजन खान यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास (२०१७ )
प्रकाशित पुस्तके:
कादंबऱ्या :
१. प्रवाह – (म.रा.सा.सं.मंडळाच्या अनुदानातून), १९८३
२. रक्तधृव – (विजय प्रकाशन, नागपूर,दु.आ.), १९८९
३. कोंडी (देशमुख आणि कं.,पुणे /दु आ.)१९९१
४. चिरेबंद (देशमुख आणि कं.,पुणे )१९९५
५. सव्वीस दिवस (विजय प्रकाशन,नागपूर )१९९६
६. उत्तरायण (देशमुख आणि कं.,पुणे)२००१
७. पडघम (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई )२००७
८. पांढर (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई )२००९
९. अश्वमेध (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,मुंबई )- २०१४
१०. पांढरे हत्ती (विजय प्रकाशन,नागपूर )२०१६ –
११. होळी ..आगामी (मॅजेस्टिक प. हाऊस, मुंबई ) २०२१
कथासंग्रह :
१. वर्तमान ( मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई) १९९१
२. दाही दिशा (विजय प्रकाशन,नागपूर )१९९४
३. शहामृग (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई) १९९८
४. तद्भव (साकेत प्रकाशन,औरंगाबाद) २००४
५. अदृष्टाच्या वाटा (विजय प्रकाशन, नागपूर) २००८
६. चंद्रोत्सव (विजय प्रकाशन, नागपूर) २०११
७. ओल्या पापाचे फूत्कार (विजय,नागपूर) २०१४
८. महत्तम साधारण विभाजक संपा. डॉ. बोपचे
९. भवताल (विजय प्रकाशन, नागपूर)२०२०
ललित लेखसंग्रह/ व्यक्तिचित्रसंग्रह :
१. ऐशा चौफेर टापूत (ॠचा प्रकाशन, नाग.), २००७
२. गोत्र (राजहंस प्रकाशन, पुणे) २०१९
समीक्षा :
१. कादंबरीकार श्री.ना.पेंडसे (ॠचा प्रकाशन)१९९५
२. सत्त्वशोधाच्या दिशा (मंगेश प्रकाशन) २००५
३. संदर्भासह (विजय प्रकाशन ,नागपूर) २००७
४. महाभारत आणि मराठी कादंबरी (विजय)२०१२
५. त्रिमिती (विजय प्रकाशन, नागपूर) २०१३
वैचारिक :
१. महाभारताचा मूल्यवेध (विजय,नागपूर) २०१०
संपादने :
१. कथांजली ( ॠचा प्रकाशन,नागपूर )१९९१
२. मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (विजय प्रकाशन, नागपूर)२००६
३. जागतिकीकरण, समाज आणि मराठी साहित्य,२०११
अनुवाद:
१. सव्वीस दिवस (हिंदी) छब्बीस दिन -उषा भुसारी
२. महाभारताचा मूल्यवेध (गुजराथी) महाभारतना मूल्योनी वेध: किशोर गौड
३. कोंडी (हिंदी) ‘घीर गया है समय का रथ’ : डॉ. सरजुप्रसाद मिश्र
४. अनंत जन्मांची गोष्ट : विश्वानाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितेचा अनुवाद
साहित्याविषयी :
१. सत्यापासून साहित्यापर्यंत (रवींद्र शोभणे यांच्या साहित्यावरील निवडक समीक्षा) विजय प्रकाशन, नागपूर- २०१५, संपा.डॉ.वंदना महाजन
२. मराठी कादंबरी: परंपरा आणि चिकित्सा (गौरवग्रंथ) विजय प्रकाशन, २०१९ संपा. डॉ.राजेंद्र सलालकर, डॉ अनिल बोपचे
पुरस्कार :
१. तल्हार स्मृती पुरस्कार (रक्तधृव)
२. लोकमत पुरस्कार (ललितलेखन)
३. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल.ठोकळ (कोंडी)
४. नाथमाधव साहित्य पुरस्कार (कोंडी)
५. भि.ग.रोहमारे पुरस्कार (कोंडी)
६. महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार (कोंडी)
७. का.क.कें.उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार (एक दीर्घ सावली)
८. ग्रंथोत्तेजक पुरस्कार (चिरेबंद)
९. रणजित देसाई पुरस्कार (चिरेबंद)
१०. विदर्भ साहित्य संघाचा वा.कृ.चोरघडे पुरस्कार (शहामृग)
११. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार (शहामृग)
१२. डॉ.अ.वा.वर्टी कथा पुरस्कार (कथालेखनातील योगदानसाठी )
१३. विदर्भ साहित्य संघाचा पु.य.देशपांडे पुरस्कार (उत्तरायण)
१४. घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार (उत्तरायण)
१५. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (अमेरिका) (उत्तरायण)
१६. समाजप्रबोधन प्रतिष्ठानचा पुरस्कार (सत्त्वशोधाच्या दिशा )
१७. सहकारमहर्षी बापूसाहेब देशमुख कथा पुरस्कार (तद्भव)
१८. औरंगाबाद महानगरपालिकेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार (तद्भव)
१९. आपटे वाचन मंदिरचा (इचलकरंजी) कादंबरी पुरस्कार (पडघम)
२०. डॉ.अनंत व लता लाभशेवार प्रतिष्ठानचा एक लक्ष रुपयांचा साहित्य सन्मान पुरस्कार (अमेरिका)
(साहित्यनिर्मितीच्या विशेष योगदानासाठी )
२१. महाराष्ट्र शासनाचा ह.ना.आपटे कादंबरी पुरस्कार (पडघम)
२२. शांताराम कथा पुरस्कार (भळभळून वाहणारी गोष्ट)
२३. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार (पांढर)
२४. कादंबरीकार वि.स.खांडेकर पुरस्कार (कादंबरीलेखनातील योगदानासाठी)
२५. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मृत्युंजय पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
२६. मराठवाडा साहित्य परिषदेचा नरेंद्र मोहरीर पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
२७. पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
२८. शब्दवेल प्रतिष्ठानचा (लातूर) कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
२९. महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
३०. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (अश्वमेध)
३१. ना. सी. फडके पुरस्कार (अश्वमेध)
३२. मृत्युंजय कार शिवाजी सावंत स्मृती साहित्य पुरस्कार (साहित्यविषयक योगदानासाठी)
३३. मनोरमा साहित्य पुरस्कार (उत्तरायण)
मानसन्मान :
१. साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती -१९९४
२. नरखेडभूषण पुरस्कार -२००५
३. सल्लागार सदस्य-साहित्य अकादमी दिल्ली (मराठी भाषा) २००८ ते २०१२
४. सदस्य अ.भा.मराठी साहित्य महामंडळ २०११ -२०१२
५. आमंत्रक -साहित्य संमेलन समिती- विदर्भ साहित्य संघ -२००७ ते २०१६ विदर्भ पातळीवर एकूण चौदा साहित्य संमेलनांचे आयोजन
व्यासपीठावरील सहभाग : साधारणत: दोनशेच्या वर विविध वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांतून वक्ता, प्रमुख पाहुणा,अध्यक्ष म्हणून सहभाग.
भूषविलेली अध्यक्षपदे :
१. विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पुसद) २००३
२. पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (जळगाव) २००९
३. बाराव्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (अंबाजोगाई) २०१०
४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बाविसाव्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद (नागपूर) २०११
५. अ. भा.सर्व संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (अमरावती) २०१७
६ . राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सव (चंद्रपूर)२०२०
काही महत्त्वाचे:
१. वर्तमान, पडघम, पांढर, चिरेबंद आणि चंद्रोत्सव या पुस्तकांचे अंध वाचकांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडज् (मुंबई) या संस्थेतर्फे टॉकिंग बुक मध्ये रूपांतर
२. भारतीय ज्ञानपीठातर्फे सर्वोत्कृष्ट कहानियाँ या मालेत इस शहर मे हर शख्स या कथेची निवड
३. ‘इस शहरमे हर शख्स’ या कथेचे एक प्रेमकहाणी या मालिकेत दूरदर्शनवरून राष्ट्रीय प्रसारण (दिग्दर्शक : बासू चटर्जी )
४. सह्याद्री वाहिनीच्या (मुंबई दूरदर्शन) ‘अमृतवेल’ या वाङ्मयीन कार्यक्रमाअंतर्गत मुलाखत प्रसारित – २१ जाने.२०१३ (मुलाखतकार : संजय भुस्कुटे)
५. ‘पांढर’ या कादंबरीवरील मराठी चित्रपट निर्माणाधीन (दिग्दर्शक -श्री.राजेश लिमकर ,पुणे)
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग : (एकूण नऊ )
१. ७६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग -२००३ (कऱ्हाड)
२ . ७९ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग -२००६ (सोलापूर )
३. ८० व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात मुलाखतीचा सूत्रसंचालक म्हणून सहभाग -२००७ (नागपूर )
४ . ८१ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात मुलाखतकार म्हणून सहभाग -२००८ ( सांगली )
५. पहिल्या साधना साहित्य संमेलनात कादंबरीकार म्हणून सहभाग –(२००८)
६ . ८३. व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग – २००९ (पुणे )
७ . ८४. व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग -२०१० (ठाणे )
८ . ८६. व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून सहभाग -२०१३ (चिपळूण )
९. ८७ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग-२०१४ (सासवड)
१०.९३ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग २०२० (उस्मानाबाद)
विशेष सहभाग : सिंगापूर येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग – २०११
अभ्यासविषय:
रवींद्र शोभणे यांचे साहित्य या विषयावर विविध विद्यापीठातून पीएच.डी साठी झालेले संशोधनकार्य :
१.रवींद्र शोभणे यांचे कादंबरीविश्व : एक चिकित्सक अभ्यास (संशोधक :प्रा.संजय गोहणे)नागपूर विद्यापीठ
२.रवींद्र शोभणे यांच्या कथा आणि कादंबरीतील वाङ्मयीन व सामाजिक जाणिवांचा अभ्यास (संशोधक: प्रा. डॉ. सुनील भावराव देसले) उ.म.वि., जळगाव
३.रवींद्र शोभणे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास संशोधक : (डॉ.रामनाथ श्रीपती फुटाणे) औरंगाबाद.
४.रवींद्र शोभणे कथा-कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास : (संशोधक : सारिका मोहिते), औरंगाबाद
५.रवींद्र शोभणे यांचे कादंबरीविश्व :एक चिकित्सक अभ्यास (संशोधक: दीपाली खवडे- टेकाडे), अमरावती
६. रवींद्र शोभणे यांचे कथाविश्व: चिकित्सक अभ्यास संशोधक: प्रा.काशिनाथ तरासे, नागपूर
विद्यापीठ पातळीवर अभ्यास:
रवींद्र शोभणे यांचे कथावाङ्मय, कोंडी, उत्तरायण, पडघम, पांढर या पुस्तकांवर विविध विद्यापीठात एम.फिल्.पदवीसाठी शोधप्रबंध सादर
पांढर आणि चिरेबंद या कादंबऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात २०१६ ते २०१९ या काळासाठी समाविष्ट