मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थितीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन लागणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही मात्र सध्याचे निर्बंध पुरेसे नाहीत. परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहेत. बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=331826345267930