सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयाच्या मनमाड जवळ असणा-या मात्र चांदवड तालूक्यात येणा-या रायपूर, निंबाळा,वागदर्डी, शिंगवे या गावात ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी आमदार डॉ.राहूल आहेर यांनी केली. या परिसरात सतत पडलेल्या पावसामुळे आणि काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले. तर मका,बाजरी खराब होण्याची भिती वाढली. त्यामुळे मतदार संघातील या नुकसानग्रस्त गावांमध्ये जाऊन येथील पिकांची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सुचना तहसिलदारांना दिल्या.