चांदवड – काँग्रेसच्या पंजाबच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पदभार स्वीकारताच पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी पाणी विज बिल माफी , पाणीपट्टी व पाणी बिल माफी घोषित केली, २४ तासांमध्ये पंजाब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही महविकास आघाडी सरकारने वीजबिल माफी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी चांदवड विधानसभेचे आ. डॅा. राहुल आहेर यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की २४ महिन्यांपासून महाआघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचे ऊर्जा मंत्री आहेत. पण, कोरोनाच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांची सक्तीने वीज कपात करण्यात आली. त्याचप्रमाणे सक्तीने वीजबिल वसुली करण्यात आले. मग माझ्यासारख्याला हा प्रश्न पडतो की काँग्रेसचा पंजाबचा शेतकऱ्यांसाठी एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय हा महाराष्ट्र द्वेष नाही का ? माझी मागणी आहे या महविकास आघाडीचे सरकारकडे की ज्या पद्धतीने काँग्रेसने पंजाबच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि पाणीपट्टी व पाणी बिल माफी केलेली आहेत. असाच न्याय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण द्यावा,