गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक येथे या हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्राद्वारे ३०० गुडघेरोपण शस्त्रक्रिया…

by Gautam Sancheti
मे 16, 2025 | 6:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Dr Prakash Patil 2 e1747400704750

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे रुग्णालय असणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक येथे रोबोटिक तंत्राद्वारे ३०० गुडघेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून उतारवयात गुडघेदुखीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी ठरत आहे. येथे कार्यरत असणारे रोबोटिक सांधेरोपणतज्ञ डॉ.प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीतच इतक्या यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे सह्याद्री हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.

या विषयी माहिती देताना, डॉ.प्रकाश पाटील म्हणाले, “पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया ही अधिक अचूक असल्याने गुडघ्यातील नैसर्गिक रचनांचे जतन तर होतेच त्याशिवाय उत्तम प्रकारे ‘नी कायनेमॅटिक अलाइनमेंट’ साधल्याने नैसर्गिक हालचालीच्या मध्येही सहजता व सुलभता येते. कमीतकमी रक्तस्त्राव, छोटी जखम, कमीतकमी वेळेत होणारी शस्त्रक्रिया आणि जलद रिकव्हरी मुळे शस्त्रक्रियेपश्चात काही तासातच रुग्णांना चालणेदेखील शक्य होते. रुग्णांना होणाऱ्या वेदनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते आणि भविष्यात ते अगदी नैसर्गिक सांध्याप्रमाणे नियमित हालचाल करू शकतात.”

वयोमानानुसार गुडघ्यांची झीज होते. वाढत्या गुडघ्याच्या त्रासामुळे अनेकदा हालचाल कमी होते त्यामुळे स्थूलता, मधुमेह रक्तदाब असे अनेक आजारदेखील उद्भवू शकतात. अशावेळेस कृत्रिम गुडघा लावण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय शिल्लक रहात नाही. परंतु रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी गुडघे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास गुडघा बदलल्यानंतर देखील अशा वयोवृद्ध माणसांना सहजतेने नियमित जीवनशैली जगता येते.

सह्याद्री हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे सांधेरोपण शस्त्रक्रियांबाबत जनजागृती करण्याचे काम गेली अनेक वर्ष चालू आहे. या हॉस्पिटल मध्ये बसविण्यात आलेला हा रोबोट अद्ययावत असून यामुळे ऑपरेशन मध्ये डॉक्टरांना अचूकता साधण्यास मदत होते अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Next Post

मानवी तस्करीचा प्रयत्न आरपीएफने उधळून लावला; ४ अल्पवयीन मुलींची केली सुटका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
image001BY5P e1747401552601

मानवी तस्करीचा प्रयत्न आरपीएफने उधळून लावला; ४ अल्पवयीन मुलींची केली सुटका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011