– निरायम स्वास्थांच्या संकल्पनेने आयुर्वेदाची उपयुक्तता समाजात कायम
– सरसंघचालक डॉ.भागवतः आयुर्वेद व्यासपीठाच्या `चरक भवन` नुतन केंद्रीय कार्यालयाचे लोकार्पण
……
श्रीकृष्ण कुलकर्णी
नाशिकः निरायम सुखी स्वास्थांची संकल्पना फार पूर्वीपासून आयुर्वेदानं मांडली आहे. त्यामुळे आयुर्वेदाची उपचारपध्दती ही वैश्विक ठरू लागली असून केवळ illness नव्हे तर सर्वांसाठी wellness चा उपचार म्हणून या पॅथीकडे पाहु लागले आहे. विशेषतः कोरोनाकाळात सर्वांनाच या आयुर्वेदाचे महत्व पटले आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. आयुर्वेदाने इतर पॅथींनाही जोडण्याचे काम करावे, त्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ सारखे संघटन उपयुक्त ठरेल,असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
सेवा ,संशोधन ,प्रचार व शिक्षण या चतुःसूत्रीद्वारे आयुर्वेद क्षेत्रात कार्य करणाऱ्या आयुर्वेद व्यासपीठ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाच्या कार्यकर्त्यांच्या देणगीतून उभारलेल्या भवनचे आज शंकराचार्य न्यास येथे डॉ.भागवत यांनी आभासी पध्दतीने लोकार्पण केले. आयुर्वेद व्यासपीठाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी केंद्रीय उपाध्यक्ष वैद्य जयंतराव देवपुजारी अध्यक्षस्थानी होते. वैद्य विनय वेलणकर ,वैद्य संतोष नेवपूरकर ,वैद्य रजनी गोखले हे व्यासपीठावर होते.
एकमेकांच्या संघटनाच्या माध्यमातून वास्तू उभारल्याबद्दल डॉ.भागवत यांनी आयुर्वेद व्यासपीठाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जीवनात संघटन हे महत्वाचे असते, कोरानाकाळात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काढा व अन्य उपचार पध्दतीच्या रूपाने आयुर्वेदाचे महत्व हे सर्वसामान्य माणसाला कळले आणि तो प्राचीन अशा हजारो वर्षाच्या उपचारपध्दतीकडे वळाला ही चांगली बाब आहे. प्राचीन काळात भवन ही संकल्पना नव्हती तर वन होते आणि या वनामधील वनस्पतीच्या माध्यमातून उपचार केले जात आणि तितकेच प्रभावी असे.
—-
उपचापध्दतीचे आदान प्रदान व्हावे
ते म्हणाले, आपल्याकडे अँलोपॅथीद्वारे लवकर उपचार होतो त्या तुलनेत आयुर्वेद उपचारपध्दतीत बरे व्हायला खूप उशिर लागतो,अशी लोकांची धारणा आहे आणि त्यात गैरकाही नाही एखादी उपचार पध्दतीतील उपचार हे कशापध्दतीने केले जातात आणि ते किती मात्रा,उपायांवर होतात,यावर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ठरतात. आजच्या युगात लोक हुशार झाले आहे. ते प्रत्येक पॅथीचा अनुभव घेऊ लागले आहे. त्यामुळे भारतीय प्राचीन असलेल्या आयुर्वेदातील अभ्यासकांनी देखील इतर पॅथींचे ज्ञान प्राप्त करावे तसेच अँलोपॅथीसह इतरही पॅथीच्या लोकांनी आयुर्वेदाचे ज्ञान आत्मसात करण्यास काय हरकत आहे. उपचारपध्दतीचे आदान प्रदान व्हायला हवे असे वाटते.
—–
गुणवत्ता अन् दर्जा सर्वात महत्वाचा
उपचार पध्दतीत दोन तीन गोष्टी या सर्वात महत्वाच्या आहेत. त्यात त्या पॅथीची गुणवत्ता अन् दर्जा काय आहे, यावर सारे काही अवलंबून असते. याशिवाय स्वस्त,सुलभ आणि सहजपणे उपचार तोही रूग्ण पूर्ण बरा कसा होईल,असा व्हायला हवा. आयुर्वेदाचा आपण विचार केला तर प्राथमिक चिकित्सा व दुसऱ्या उपचार पध्दतीत होणारा खर्च यात फरक दिसतो. उशिरा का होईना आयुर्वेदाची मात्र,गुणकारी ठरते, आयुर्वेदातील काही उपचार हे तातडीने बरे होण्यास मदतीचे ठरते, हेही आपल्याला नाकारता येणार नाही. यावेळी देवपूजारी यांची राष्ट्रीय आयोग भारतीय चिकित्सा पद्धती दिल्लीचे प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आयुर्वेद व्यासपीठातर्फे सरसंघचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रजनी गोखले यांनी प्रास्ताविक केले. सतोष नेवपूरकर यांनी परिचय करून दिला. विलास जाधव यांनी आभार मानले, मंदार भणगे यांनी वैद्यगीत सादर केले. यावेळी आयुर्वेद व्यासपीठाच्या जेष्ठ कार्य कर्त्याचे तसेच कोविड महामारीत विशेष कार्य केलेल्या वैद्यांचा वास्तुनिर्माते श्री पोद्दार आशुतोष गुप्ता, रणजित पुराणिक आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी वैद्य शिरीषकुमार पेंडसे ,वैद्य विलास जाधव, वैद्य मल्हार जोशी, वैद्य संतोष नेवपूरकर , वैद्य राजेश गुरु ,वैद्य आशुतोष यार्दी ,कमलेश महाजन ,सौरभ जोशी आदि उपस्थित होते
———
व्रतस्थपणे प्रयत्न व्हायला हवे
चिकित्सा सहज,सुलभ होण्यासाठी आयुर्वेदाचे सर्वाधिक महत्व हे कोरोना काळात लोकांना पटले आहे, भारतातील १३० कोटी लोकांपर्यत ही उपचारपध्दती पोहण्याची आज गरज आहे, त्यासाठी आपल्याला व्रतस्थपणे प्रयत्न करायला पहिजे, केवळ आजारी रूग्ण बरे करणे नव्हे तर तो कायम निरामय आणि आहारविहाराच्या बाबतीत स्वस्थं राहिल याबाबत विचार करायला हवा, त्यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ आयुर्वेद,व्यासपीठाला हाती घ्यावे लागेल आयुर्वेद हे वर्षानुवर्षे चालणारे शास्त्र आहे. त्यासाठी वैश्विक प्रचारासाठी प्रशिक्षक,विद्यार्थी,तज्ञ,वैद्
……
क्षणचित्रे
-आयुर्वेद व्यासपीठतर्फे सरसंघचालकांना मानपत्र देण्यात आले. संस्कृतमधील मानपत्रांद्वारे डॉ.भागवत यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
-प्रारंभी सांघिक गीत व धन्वंतरी स्तवन झाले.
-परिसरातील फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
-डॉ.भागवत यांचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले.
-भारतमातापूजन करुन डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या फोटोंना पुष्पहार घालण्यात आला.
– आयुर्वेद व्यासपीठाच्या कार्याचा अहवाल द्रुक्श्राव्य माध्यमातून सादर झाला.