नाशिक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांचा नाशिक येथे दि १४ व १५ जुलै रोजी दोन दिवसांचा दौरा आहे. १४ रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल,गंगापूर रोड येथे दुपारी दोन वाजता होणार असून या कार्यक्रमास डॉ भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच त्यानंतर कन्नमवार पुलाजवळील या नूतन कार्यालयाच्या वास्तुस ते भेट देतील.
१५ जुलै रोजी पू स्वामी श्री सवितानंद सेवा समिती (तरसाडा-द.गुजराथ) द्वारे आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात डॉ भागवत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नक्षत्र लॉन्स,गंगापूर रोड या कार्यालयात हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता आयोजित केला आहे. कोरोना प्रतिबंधामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोन्ही कार्यक्रम संपन्न होणार आहेत.अशी माहिती रा स्व संघाचे नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी कळविले आहे.