नवी दिल्ली – देशात कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कोरोना महामारीच्या संकटाशी सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं हाच नेमका उपाय असल्याचं म्हटलं आहे. केवळ किती जणांना लस दिली यापेक्षा किती टक्के लोकसंख्येला लसीचं संरक्षण मिळालं हे महत्त्वाचं आहे. सार्वजनिक आरोग्याबाबत सध्याची परिस्थिती आणीबाणीची असून लस उत्पादकांना निधी आणि इतर सहाय्य सरकारने करावं असं डॉ.सिंग यांनी सुचवलं आहे.