रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन….देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला

by India Darpan
मे 20, 2025 | 11:27 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 39

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसेच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’संदर्भातील त्यांचं संशोधन मैलाचं दगड ठरलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील.

‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मानसन्मानाने गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचं निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांनी सुरु केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य पुढे सुरु ठेवणे, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मान्सूनपूर्व पाऊस नुकसानी बाबत शेतकऱ्यांना तातडीने मदत करा….किसान सभेची मागणी

Next Post

छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष…

Next Post
IMG 20250520 WA0318 1

छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011