नाशिक – शहरातील मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बदलत्या व धावपळीच्या जीवनशैलीमुळे समाजात मधुमेह डायबेटिसचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी नव्याने मधुमेह समजलेल्या लोकांना औषधे सुरू करण्यापूर्वी केवळ जीवनशैली बदलातून मधुमेहमुक्त होण्यासाठी डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांनी क्लिनिक सुरू केले आहे. येथे मधुमेहाबाबत माहिती देणे, मधुमेहाची भिती घालवणे, आहारातील बदल, व्यायाम याद्वारे रुग्णांना योग्य वेळी सल्ला मिळून ते परत मधुमेहमुक्त होण्यासाठी मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी दररोज दुपारी 3 ते 6 या वेळात मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी ऑफिस नं. 3 पहिला मजला, मार्गारेट टॉवर, कॅनडा कॉर्नर, नाशिक या पत्त्यावर संपर्क साधावा. येताना नेहमीप्रमाणे HbA1c, Fasting insulin या दोन्ही ब्लड टेस्ट (रक्त चाचण्या) करून
येणे आवश्यक आहे. मार्गदर्शनासाठी डॉ. रत्ना अष्टेकर दररोज उपलब्ध असतात. अधिक माहितीसाठी वंदना जोशी 9372107784 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.