शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जोधपूरचे डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांना डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

by India Darpan
फेब्रुवारी 17, 2022 | 5:41 pm
in राष्ट्रीय
0
IMG 20220217 WA0020

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑस्टियोपॅथी द्वारा देश-विदेशातील लाखो रुग्णांवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून यशस्वी उपचार करणारे जोधपूर, राजस्थानचे सुविख्यात डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांना २०२२ चा श्री सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रतर्फे देण्यात येणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सी. मो. झाडे फाउंडेशनचे विश्वस्त नानाभाऊ समर्थ यांनी माहिती देताना सांगितले की, देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लक्ष रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली असून दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्याचे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीतील कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख, किनवट येथे आदिवासींच्या आरोग्यावर काम करणारे डॉ. अशोक बेळखोडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी हिंगणा तालुक्यातील संजीवन वृद्धाश्रम आणि निसर्गोपचार केंद्र परिसरात पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ संपादक श्री. मधुकर भावे यांच्या अध्यक्षतेत आणि संजीवन सोशिओ मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय उगेमुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्या ॲस्टियोपॅथिने रुग्णांना चमत्कारित्या फायदा होतो. ॲस्टियोपॅथी ही भारतीय परंपरागत उपचार पद्धती आहे. मात्र, भारतातून ही पॅथी नाहीशी झाली. विदेशात या पॅथीला उचलून धरण्यात आले. जोधपूर येथे स्वर्गीय सांवरलाल जी पाराशर हे प्रख्यात हाडांचे वैद्य होते. त्यांनी या पॅथीला भारतात पुनर्जिवित केले. त्यांच्या हा वसा डॉ. गोवर्धनलाल आणि त्यांचे सर्व कुटुंबीय चालवितात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

५ वर्षात तब्बल साडेसात हजार कोटींची माया जमविणारा दूधवाला आहे तरी कोण? बघा हा व्हिडिओ

Next Post

मुंबई आणि नवी मुंबईला अवघ्या अर्ध्या तासात जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीचे एवढे आहे तिकीट

Next Post
फोटो 4

मुंबई आणि नवी मुंबईला अवघ्या अर्ध्या तासात जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीचे एवढे आहे तिकीट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011