नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलची, आज पाहणी केली. तपासणी दरम्यान, त्यांनी प्रथम कोविड लसीकरण केंद्राची पाहणी केली आणि तेथे आलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर पीजीआयएमईआर कॅम्पसमधील ग्रंथालयाचीही पाहणी केली. तसेच रूग्णांच्या सुविधांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या स्वयंपाकघराची पाहणी केली आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासली. त्यानंतर डॉ भारती पवार यांनी रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजी विभागाच्या ICU ला भेट दिली. आणि अस्थी विभागाच्या वॉर्डची पाहणी करून तेथे दाखल रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ग्राउंड रिपोर्टसाठी त्यांची ही भेट सर्वत्र चर्चेची ठरली.
सरतेशेवटी, वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णांसाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचे आणि रुग्णालयाची उत्तम काळजी आणि स्वच्छतेचे निर्देश दिले.नेफ्रोलॉजी विभाग, अतिदक्षता विभाग आणि अस्थी विभागाच्या वॉर्डची केली तपासणी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या परिसरातील ग्रंथालयाची पाहणी केली. रुग्णालयामध्ये असलेल्या स्वयंपाकघराची पाहणी केली आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासली.
सरतेशेवटी, वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णांसाठी सर्वोत्तम सुविधा
देण्याचे आणि रुग्णालयाची उत्तम काळजी आणि स्वच्छतेचे निर्देश दिले.
नेफ्रोलॉजी विभाग, अतिदक्षता विभाग आणि अस्थी विभागाच्या वॉर्डची केली तपासणी
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या परिसरातील ग्रंथालयाची पाहणी केली.
रुग्णालयामध्ये असलेल्या स्वयंपाकघराची पाहणी
केली आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासली