नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – दिंडोरी – वणी – कळवण या राज्य महामार्गाची अत्यंत्य दुरावस्था झाली आहे. यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने झाली. मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नव्हता. या रस्त्याच्या अनेक तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या कडे केलेल्या होत्या. अखेर डॉ.भारती पवार यांनी अधिका-यांना सोबत घेत रस्त्याची पहाणी करत अधिका-यांना तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच यापुढे नागरीकांची गैरसोय होणार याची खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी त्यांनी अधिका-यांना दिल्या.