मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉ. बत्राज हेल्थकेअरने संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींना मोफत होमिओपॅथी सल्ला आणि औषधोपचार दिले जाणार आहेत. डॉ. बत्राज फाऊंडेशन दर महिन्याच्या दुस-या बुधवारी/गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत डॉ. बत्राज क्लिनिक्समध्ये ही सुविधा देणार आहे.
डॉ बत्राज हेल्थकेअरकडे होमिओपॅथीच्या गुणांसह विविध आजारांवर उपचार करण्याचे ४० वर्षांहून अधिक काळाचे वैद्यकीय कौशल्य आहे. ३०० हून अधिक डॉक्टर्स आणि २०० हून अधिक क्लिनिक्सच्या भक्कम पायासह डॉ बत्राजने १५ लाखांहून अधिक आनंदी रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ बत्राज हेल्थकेअर वंचित व्यक्तींपर्यंत होमिओपॅथीचा उत्तम प्रसार करण्यासाठी १६० हून अधिक क्लिनिक्समध्ये मोफत वैद्यकीय सेवा प्रदान करते.
डॉ बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे ग्रुप सीईओ संजय मुकर्जी म्हणाले, “आमच्या संस्थापकांचा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे होमिओपॅथीचा उपचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचवणे. पैशाच्या कमतरतेमुळे कोणीही वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये असे आम्हाला वाटते. हा उपक्रम योग्य दिशेने उचलण्यात आलेले एक लहानसे पाऊल आहे, या उपक्रमाच्या मदतीने डॉ बत्राज हेल्थकेअर वैद्यकीय उपचारांपासून वंचित असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचते.”
रूग्णांसाठी होमिओपॅथीचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सर्वसमावेशक उपचार देते. दुसरा फायदा असा आहे की, होमिओपॅथी सुरक्षित आहे आणि नैसर्गिकरित्या उपचार करते. होमिओपॅथीच्या मदतीने आणि ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी दरासह डॉ. बत्राज हेल्थकेअरने अॅलर्जी, दमा, केस गळणे, मायग्रेन, चिंता व नैराश्य, सोरायसिस, पीसीओएस, पांढरे ठिपके असे अनेक आजार असलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांवर उपचार केले आहेत. मोफत समुपदेशन व उपचाराचा लाभ घेण्यासाठी आणि अपॉइण्टमेंट बुक करण्यासाठी ८६५७८ ७८१७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Dr Batras Homeopathy Free of Cost Treatment
Dr Mukesh Batra
Batras Healthcare Foundation