अॅड प्रणीता देशपांडे (हेग, नेदरलँडस)
भारतीय दूतावास च्या गांधी सेंटर नेदरलॅंडस या सांस्कृतिक शाखेने आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘India@75’ या चालू उत्सवाचा एक भाग म्हणून, नेदरलँडमधील भारताचा दूतावास च्या गांधी सेंटर नेदरलॅंडस येथे आंबेडकर जयंती साजरी केली आणि या सांस्कृतिक केंद्रात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले.
या कार्यक्रमाला नेदरलँड्समधील भारताच्या महामहिम राजदूत श्रीमती रीनत संधू आणि गांधी केंद्राचे संचालक श्री. शिव मोहन सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमाला नेदरलँडमधील भारतीय डायस्पोरा देखील उपस्थित होता. श्रीमती संधू यांनी आपल्या भाषणात आधुनिक भारताचे निर्माते म्हणून बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची भूमिका आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सामाजिक उत्थानासाठी त्यांचे योगदान यावर भर दिला. यावेळी पत्रकार अॅड प्रणिता देशपांडे यांनी डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या “भारतीय संविधान” या पुस्तकाची प्रत नेदरलँड्समधील भारताच्या राजदूत श्रीमती रीनत संधू जी यांना सुपूर्द केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला व कार्यक्रमाची सांगतां झाली.