इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे एखादी डिग्री असली तरी काही जण स्वतःला खूप हुशार समजतात, परंतु एका व्यक्तीकडे आहेत म्हणजे शंभरापेक्षा जास्त डिग्री असून या माणसाला अजिबात गर्व नाही. अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे एका डॉक्टरांनी सर्वाधिक शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदव्या घेण्याच्या बाबतीतील वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
होय, सुमारे १२३ पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्र मिळवणारे उदयपूरमधील अर्थ ग्रुप ऑफ कंपनीजचे सीएमडी आणि सीईओ डॉ. अरविंदर सिंह यांना यांची कामगिरी थक्क करणारीच आहे.
विशेष म्हणजे डॉ. सिंह यांनी ज्या १२३ पदव्या मिळवल्या आहेत. त्यामधील ७७ पदव्या ह्या अकादमिक आहेत, तर ४६ पदव्या ह्या गैर शैक्षणिक आहेत. त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. या पदव्या त्यांनी १९८९ ते २०२२ या काळात मिळवल्या आहेत. डॉ. सिंह हे दिव्यांग आहेत. त्यांनी २००९ मध्ये आयआयएममध्ये उच्च स्तरावर पोहोचण्याचा विक्रम केला होता.
तसेच वैद्यकीय क्षेत्रासह व्यवस्थापन, कायदे यासारख्या क्षेत्रामध्येही त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. कॉस्मेटोलॉजी, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रातीह त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. त्यांनी जेव्हा आयआयएममधून शिक्षण घेतले तेव्हा त्यांना २००८ मध्ये स्कॉटलंडमधून वार्षिक ९० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी ऑफर झाली होती. मात्र त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला आणि भारतातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातही शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असूनही त्यांनी खेळांमध्ये प्रावीण्य मिळवले. त्यांनी नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच स्कूबा डायविंगमध्येही त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे.
डॉ. सिंह हे राजस्थानमधील पहिले आणि एकमेव आंतरराष्ट्रीय बोर्ड प्रमाणित कॉस्मेटिक स्किन स्पेशालिस्ट आणि अॅस्थेटिक फिजिशियन आहेत. त्यांना हल्लीच कॉस्मेटिक डर्मेटोलॉजीच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सन्मानित केले होते. या शिवाय डॉ. सिंह यांनी ऑक्सफर्ड, अमेरिकन असोसिएशन ऑफ अॅस्थेटिक मेडिसीन, कॅनेडियन बोर्ड ऑफ अॅस्थेटिक मेडिसिन, इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ स्वीडन आणि जर्मनीमधून कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी, अॅस्थेटिक मेडिसिन, अॅस्थेटिक्स आणि क्लिनिकल कॉस्मेटोलॉजी आणि मेडिकल लेझरमध्ये डिप्लोमा आणि सर्टिफिकेट मिळवले आहेत.
Dr Arvinder Singh 123 Degrees Record