इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मा.डॉ.अपूर्व (भाऊ) हिरे यांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाबाबत राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून येत्या बुधवार, २ जुलै रोजी मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी १२ वाजता प्रवेश करणार आहे.
डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्यासह शेकडो समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिका-यांसह हा पक्ष प्रवेश सोहळा निश्चित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन डॉ. अपूर्व हिरे यांनी त्यांच्या पुढील वाटचाली बाबत सर्व पत्रकारांशी चर्चा करून माहिती दिली.
नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळेस सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.