मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांची इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य २०२२-२३ या वर्षीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. भांडारकर हे इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष असून, नाशिक बालरोगतज्ज्ञ संघटनेचे नियोजित अध्यक्ष आहेत.
भांडारकर हे एव्हरशाईन क्लब चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य आय एम ए चे सहसचिव म्हणुन त्यांनी २०२१-२२ या कालावधीत काम पाहिले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आय एम ए च्या क्रिडा समितीचे सह-अध्यक्ष पद देखील भूषविले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून साफल्य बाल रुग्णालय, रेनबो बाल रुग्णालय व गंगा- ऋषिकेश हॉस्पिटल यांच्या माध्यमातून समाजास वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांची निवड ही नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी भूषणावह बाब असल्याने त्यांच्या या यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी, नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर पवार, डॉ. निलेश निकम, डॉ.आवेश पलोड, डॉ. योगेश भदाणे, डॉ. सचिन चौधरी, डॉ. पंकज भदाणे, आय एम ए च्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील आणि सचिव डॉ. विशाल पवार तसेच इतर मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
क्रिकेट च्या माध्यामातून डॉ भांडारकर यांनी गेल्या काही वर्षांत डॉक्टरांच्या खेळ, फिटनेस या क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. याचाच भाग म्हणून नाशिक येथे गेल्या काही वर्षांत आय एम ए च्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील क्रिडा स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याव्यतिरिक्त डॉक्टरांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षांत हिरिरीने पुढाकार घेऊन नाशिक मधील वैद्यकीय व्यावसायिकांची एकता बळकट करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
नजिकच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील सर्व स्थानिक आय एम ए आणि राज्य आय एम ए यांच्यात योग्य समन्वय साधत रुग्णहित आणि वैद्यकीय व्यवसायिकांचे प्रश्न यासाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याचा मानस यावेळी डॉ भांडारकर यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व क्षेत्रांतून या नवीन जबाबदारी बद्दल त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे.
Dr Aniruddha Bhandarkar IMA Vice President Selection