नाशिक – डॉ. अक्षय पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मध्ये विद्यार्थी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नुकतेच दिले आहे
निवडीनंतर पाटील यांनी सांगितले की, आपल्याला दिलेल्या जबाबदारीचा भाजप युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल. तसेच त्यांनी यावेळी विधानसभा विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, युवा मोर्चा प्रदेश प्रभारी प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे , माजी मंत्री गिरीष महाजन, नाशिक महानगर भाजप प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप,शहराध्यक्ष गिरीष पालवे, महापौर सतिष नाना कुलकर्णी, सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, आ.राहुल ढिकले, आ.सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, प्रा. सुहास फरांदे, महानगर सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन आण्णा पाटील, सुनिल केदार, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मनीष बागुल, सतिष बापू सोनवणे, जगदीश पाटील, नाशिक महानगर महिला मोर्चा मंडल अध्यक्ष हिमगौरी आडके, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष शशांक हिरे, कुणाल वाघ, सुरेश अण्णा पाटील तसेच सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.