मंगळवार, मे 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; दादा भुसेंच्या अडचणी वाढणार (व्हिडिओ)

by India Darpan
जानेवारी 27, 2023 | 6:36 pm
in स्थानिक बातम्या
0
Fnen7N2aYAISl00 e1674824710816

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन आणि नाशिक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ. अद्वय हिरे-पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही बाब आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. खासकरुन शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

मालेगाव तालुक्यासह परिसरात डॉ. अद्वय हिरे-पाटील यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्याशिवाय कृषी, सहकार आणि अन्य क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. आता त्यांनी ठाकरे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ भाजपातील मालेगावचे अन्य नेते व पदाधिकारी ठाकरे गटात जाण्याची चिन्हे आहेत. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून सरकार असूनही कामकाज होत नसल्याची खद-खद अद्वय हिरे यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत मालेगांव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. अद्वय हिरे-पाटील हे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे चिरंजीव आहेत. तर, त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हे नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. हिरे घराण्यात राजकारणाची मोठी परंपरा आहे. डॉ. अपूर्व हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत  डॉ. अद्वय हिरे हे ठाकरे गटाकडून धुळे-मालेगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते. सध्या याठिकाणी भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे खासदार आहेत. डॉ. अद्वय हिरे यांच्यामुळे डॉ. भामरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच, दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. तेव्हापासून हिरे कुटुंब मालेगावमधील विधानसभा निवडणूक लढवित नाही. आता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. अद्वय हिरे हे मोलाची भूमिका बजावणार आहेत. भुसे यांनी बंडखोरी करुन शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भुसेंना अडचणीत आणण्यासाठी हिरे कुटुंबिय पूर्ण ताकदिनीशी लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

मा.श्री. अद्वय आबा हिरे पाटिल यांचा पक्षप्रवेश । शिवसेना भवन, दादर – #LIVE ⬇️

? शिवसेना परिवारामध्ये आपले स्वागत आहे ? #UddhavThackeray @advay007 #ठाकरेपरिवार #कुटुंबप्रमुख #आपलीशिवसेना #MAHARASHTRA

[ शुक्रवार – 2️⃣7️⃣ जानेवारी 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ ] https://t.co/wfMrD5dHGc

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 27, 2023

Dr Advay Hire Join Shivsena Thackeray Gorup Politics
Politics Malegaon BJP Leader Join Thackeray Group Shivsena
Dr Advay Hire Patil

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार यांनी आता स्पष्टच सांगितलं…

Next Post

पिंपरी चिंचवडमध्ये ईडीचे छापे! आता कुणावर झाली कारवाई? आणि का?

Next Post
enforcement directorate

पिंपरी चिंचवडमध्ये ईडीचे छापे! आता कुणावर झाली कारवाई? आणि का?

ताज्या बातम्या

2 6 1024x711 1

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मे 13, 2025
cricket

नाशिकमध्ये पावसामुळे अनिर्णित ठरलेल्या या सामन्यात अक्षत भांडारकरचे लागोपाठ दुसरे शतक…

मे 13, 2025
rain1

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

मे 13, 2025
crime 13

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मे 13, 2025
crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे केले लंपास

मे 13, 2025
NEW LOGO 11 1

आज राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल…या नऊ अधिकृत संकेतस्थळाला द्या भेट

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011