नाशिक – नाशिकच्या ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या इम्युनोसेब आणि बायोम अल्ट्रा या उत्पादनांना अमेरिकन गव्हर्मेंटच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची मान्यता मिळाली आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत विविध प्रकारचे शारीरिक त्रास जाणवत असतात. या त्रासापासून १४ दिवसांमध्ये एन्झाइम व प्रोबायोटिक्सद्वारे रुग्णाची मुक्तता होऊ शकते असे स्वीडनच्या मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोध प्रबंधात नमूद करण्यात आले आहे. या प्रबंधानुसार वैद्यकीय चाचणी केलेल्या ९१ टक्के लोकांचा थकवा पूर्णपणे नाहीसा झाल्याचे आढळून आले आहे. थकवा, भूक न लागणे,अशक्तपणा, अंगदुखी, श्वास घेण्यास अडचण, छाती दुखणे,सांधेदुखी, निद्रानाश, विस्मरण, एकाग्रता भंग पावणे अशा प्रकारच्या ११६ वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.कोरोनाने जेवढे नुकसान झाले नाही त्यापेक्षा अधिक त्रास रुग्णांना या लक्षणांमुळे जाणू शकतो. कोरोना आजाराची तीव्रता गंभीर अथवा सौम्य असली तरी वरील लक्षणे रुग्णांमध्ये उद्भवू शकतात. या त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रोबायोटिक्स आणि एन्झाइम्स प्रभावी ठरू शकतात. जगभरातील लोकांना या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
याबाबत ॲडव्हान्स्ड एन्झाइम्समधील संशोधक डॉ. अभिजित राठी यांनी सांगितले की, लांबलेल्या कोविड संदर्भात आम्ही केलेल्या कामाची दखल अमेरिकन गव्हर्मेंट च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने घेतली असून डॉक्टर फॅक्ट शीट फाॅर कोविडमध्ये स्थान देण्यात आले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या संशोधित उत्पादनांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. ही उत्पादने रुग्णांना ॲमेझॉन तसेच www.advancedenzymesdirect.com या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ७२०८८३२३२२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
आमच्यासाठी अभिमानाची बाब
कोविड संदर्भात आम्ही केलेल्या संशोधनाची दखल अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने मनापासून घेतली आहे. या डॉक्टर फॅक्ट शीट फॅार कोविडमध्ये स्थान देण्यात आले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या संशोधित उत्पादनांचा गरजूंनी योग्य वेळी लाभ घ्यावा.
-डॉ. अभिजित राठी,संशोधक अॅडव्हान्स एन्झाइम